नवोदय ऑनलाईन टेस्ट 5

  नवोदय ऑनलाईन टेस्ट 5

                 विषय : भाषा 

Navodaya Online Test


            जनतारूपी जनार्दनाची जो मनोभावे सेवा करतो, तोच ईश्वराला प्रिय होतो. आज या जगात अशी लक्षावधी माणसे आहेत की, त्यांना तुमच्या-आमच्या मदतीची गरज आहे. कुणी किरकोळ आजारी, कुणी रोगी, कुणी लुळे तर कुणी पांगळे ! बांधली, बहिरी, मुकी, मागासलेली अनाथ पोरं । समाजात अशांना कुणी जवळ करीत नाही. पण त्यांना विजय मर्चेंट यांनी जवळ करून प्रचंड कार्य केले. या लोकांना विजय मर्चट देव वाटत होते; पण विजय मर्चेंट यांनी या जनतेलाच देव मानले. अशा असहाय समाजाची सेवा करणे, त्यांना मदत करणे, त्यांच्या उदास जीवनात उत्साह उत्पन्न करणे, एवढेच नव्हे, तर त्यांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे हेच खरे महत्त्वाचे कार्य आहे. त्यांना कोरडी सहानुभूती नको, त्यांच्या उ‌द्घाराची आच नको; तर त्यांना जवळ करणारा सतत प्रोत्साहन देणारा बंधुभाव हवा.


1. ईश्वराला कोण प्रिय होतो?


(A) स्वतःवर प्रेम करणारा

(B) अपंग असणारा

(C) सतत प्रोत्साहन देणारा

(D) लोकांची सेवा करणारा.


2. समाजसेवकाचे महत्त्वाचे कार्य कोणते ?

(A) अपंगांना खाऊ घालण्याचे

(B) अपंगांचा उद्घार करण्याचे

(C) अपंगांना मदत करण्याचे

(D) अपंगांना स्वावलंबी बनवण्याचे.


3. विजय मर्चेंट यांनी कोणाला देव मानले ?

(A) जनार्दनाला

(B) माणसांना

(C) अनाथांना

(D) बंधुभावाला.


4. अपंगांना काय नको असते ?

(A) कोरडी सहानुभूती

(B) बंधुभाव

(C) प्रोत्साहन

(D) मदत.


5. अपंगांचे जीवन कसे असते ?

(A) उत्साही

(B) उदास

(C) स्वावलंबी

(D) आनंदी.



Comments

  1. Swadhinta निलेश दळवी

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for you answers...

Popular posts from this blog

नवोदय ऑनलाईन टेस्ट 4

JNVST Preparation Tips for 2025

Exam Day Tips and Strategies for JNVST